सतीचे वाण’ म्हणजे गोवामुक्तिसंग्रामच्या गौरवशाली स्मृति आहेत. त्या अनुभवल्या आहेत संग्रामात सक्रीय भाग घेतल्याच्या ‘गुन्ह्या’ दाखल २६ वर्षे कारावासाची शिक्षा झालेल्या मोहन रानडे यांनी. मुक्तिसंग्राम, गोवा व पोर्तुगाल येथे भोगावा लागलेला १९५५ ते १९६९ पर्यंतचा तुरुंगवास, अफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीतील स्वातंत्र्य लढा, पोर्तुगालमधील हुकूमशाहीविरुद्धचा दीर्घ संघर्ष याच्याशी संबंधित या स्मृति आहेत.गोवा मुक्तिसंग्राम गोव्यापुरता कधीच सीमित नव्हता. भारतीय स्वातंत्र्य युद्धातील ती अखेरची लढाई होती, तर पोर्तुगीज साम्राज्यवादविरोधी युद्धातील ती पहिली रणभेरी होती. गोवामुक्ति भारतीय स्वातंत्र्याची पूर्णता होती, तर अफ्रिकेतील पोर्तुगीज सम्राज्याची तसेच पोर्तुगालमधील हुकुमशाहीची ती मृत्यु घंटा होती.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “सतीचे वाण”

There are no reviews yet.