Sale!
, ,

वारी


पंढरपूरची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. वारी ही भक्ती परंपरेची लोकधारा आहे. विठ्ठल अवघ्या मराठी मनाचे आद्य दैवत. ज्ञानोबा- तुकाराम या दोन शब्दात भागवत धर्माच्या परंपरेचे सार सामावले आहे. वारी म्हणजे संपूर्ण निष्ठेने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे. ही वाटचाल जशी अध्यात्माची तशीच आयुष्याची ही. वारी हे माणसाच्या आयुष्याचे विद्यापीठ आहे, असं म्हटलं जातं, ते अगदी सार्थ आहे. वारी मुळे माणूस आतून समृद्ध होतो, परिपूर्ण होतो, सर्वात्मक होतो. भारतीयां प्रमाणेच विविध देशातील परदेशी अभ्यासकांत ही वारीविषयी प्रचंड कुतूहल आहे. एक प्रकारचा चौदा पंधरा लाखाचा निरपेक्षपणे साजरा होणारा अध्यात्मिक सोहळा अवघ्या विश्वभरात इतरत्र कोठेही आढळत नाही. वारीच्या या स्वयंभू, शिस्तबद्ध, चैतन्यदायी सोहळ्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही झालेली आहे. वारीच्या मूळ स्वरूपाचा विविधांगी पैलूंचा आणि अनेक रंगी अनुभूतींचा विविध परींनी घेतलेला हा शोध, वेध, साहित्यिक, संशोधक, रसिक- वाचक, वारकरी आणि विठ्ठल भक्त अशा सर्वांना विचार प्रवाण करणारा आणि एक वेगळी अनुभूती देणारा ठरेल.

450.00 500.00